महाराष्ट्र

जगदंबा ,आदिनाथ घेतला आता विठ्ठल कारखान्यावर डोळा – माजी मंत्री राम शिंदे यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

भाजपा उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारार्थ सभा

 

मंगळवेढा : अजित पवारांनी नगर जामखेडचा जगदंबा कारखाना ताब्यात घेतला, त्यांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सुद्धा घेतला आहे ,आता त्यांचा डोळा पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यावर आहे. या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास याच मुळे उशीर झाला. त्यांना उमेदवारी पार्थ पवार यांना द्यायची होती. मात्र ते जमले नाही, शेवटी विठ्ठल कारखाना अवसायनात काढायचा आणि तो आपल्या ताब्यात घ्यायचा हा डाव अजित पवारांचा असल्याचा आरोप माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केला.
मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी,गणेश वाडी, शेलेवाडी, डोंगरगाव ,अकोला, गुंजेगाव, ममदाबाद या भागात प्रचार सभा झाल्या. या सभांना राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, आ.सचिन कल्याण शेट्टी, आ.राम सातपुते,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, येताळा भगत, औदुंबर वाडदेकर ,मच्छिंद्र भोसले, सचिन शिवशरण, भाजप जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण यांची उपस्थिती होते.
या निवडणूक प्रचारादरम्यान समाधान आवताडे म्हणाले की, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची वीज तोडण्याचे काम केले पाणी हे आग विझविण्याचे काम करते परंतु येथील पाणी राजकारणाची आग भडकावण्याचे काम करते आरोग्य शैक्षणिक वाडीवस्ती रस्ता पाणी समस्या आहेत पण गेली अकरा वर्षे तुम्ही काय केले? गरजू लोकांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता विक्रमी निधी दिला.या मातीतील ऋण फेडण्याची आता वेळ आली आहे .एम आय डी सी ची जागा सौरऊर्जेला दिली.त्यामुळे विकासापासून वंचित असलेल्या या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता मला मतदान रुपी आशीर्वाद द्या.असे आवाहन आवताडे यांनी केले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत,अक्कलकोट चे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभांना हजेरी लावली.या प्रचारदौऱ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका