‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांची ‘मास्क’ची विचारणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बार्शी येथील त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई ची मागणी
पंढरपूर -कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड भरावा लागत असल्याच्याही दिसून येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी येथील पदाधिकाऱ्यांने मास्क का लावला नाही अशी विचारणा करणाऱ्या पोलिसांवरच दमबाजी केल्याचा व्हिडिओ प्रंचड व्हायरल झाला असून त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
एकीकडे मास्कमुळे कोरोनाचा पसार रोखला जातोय म्हणूनच “मास्क लावाल, तर वाचाल ” अशी जाहिरातही आता सरकारकडून केली जातेय. आणि पोलिसांकडून यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसून येत असतानाच
पंढरपूर येथील तिनरस्ता चौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी बार्शि येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी दमबाजी करत असून तुम्ही दारू पिऊन माझ्याशी बोलत असल्याचा खोटा आरोप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
घटनाअशी कि
तिनं रस्ता चौकात चारचाकी गाडी पोलिसांनी अडविली.अन् मास्क लावला नाही म्हणून दंड भरा आणि पुढे जा . असं सांगितलं तर त्या गाडीतून एक कडक कपड्यातील माणूस खाली उतरला मास्क न लावलेला……त्याने तोऱ्यात बोलायला सुरुवात केली.मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. गाडी का आडवली! मला ओळखले नाही का ? आणि हो तुम्ही दारू पिऊन माझ्याशी बोलताय….! आणि बरंच
मास्क लावला नाही म्हणून दंड भरावा लागेल असं सांगितल्याने त्याने चक्क पोलिस सहकारी दारू पिल्याचा खोटा आरोप करीत वरीष्ठांना फोन लावून तक्रार केली…..!
तर वरिष्ठांनीही लगेच संबधीत कर्मचार्यास आदेश दिला कि .’जावू दे,सोड त्यांना ” वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या पदाधिकाऱ्याला सोडून दिले पण
त्यानी आपल्या सहकाऱ्यांवर केलेला खोटा आरोप खोडून काढण्यासाठी ‘तोंडापुढे अॅनलाइझर मशीन धरली अन् तपासणी केली’ त्यावेळी ‘नो आॅल्कोहल’ असे मशीन मध्ये दिसताच त्या पदाधिकाऱ्यांचा चेहरा पुरता काळवंडला.आणि तो मान खाली घालून मार्गस्थ झाला.
एकीकडे राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्मचारी राञदिवस कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी नियम धाब्यावर बसवून कर्मचार्यावर दबाव आणून नियमांची पायमल्ली करीत आहेत.तर सर्वसामान्य जनतेला माञ दिलेल्या नियमांचे पालन करण्याची सक्ती केली जात असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. अश्या बेजबाबदार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून पोलिसांवर खोटा आरोप केला म्हणून कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.