…१० वर्ष कृषीमंत्री मग साखरेचे दर वाढवण्याची भूमिका का घेतली नाही- आ.पशांत परिचारकांचा शरद पवारांना सवाल
कोणत्या विचाराचे वारसदार आहात...कारखाने बंद पाडण्याच्या ? : आ.परिचारक

कारखान्याच्या काही कर्मचार्यांना अर्बन बँकेच्या माध्यमातून 50 – 50 हजार रूपये कर्ज उपलब्ध करून दिले. यामुळे विरोधकांनी सांगावे की ते कोणत्या विचाराचे वारसदार आहेत .. कारखाने बंद पाडायच्या ..संस्था बंद पाडायच्या?
पंढरपूर- शरद पवार साहेबांन बद्दल आमच्या मनात आजही आदर आहे ,उद्याही राहील .पण साहेब दहा वर्ष कृषीमंत्री होते मग साखरेचे दर ३१०० रुपयांच्या वर वाढविण्याची भूमिका का घेतली नाही.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बावीसशे ते चोवीशे रुपये विकणारी साखर एकतीशे रुपयांच्या खाली विकायची नाही असा नियम केला त्यामुळे शेतकऱ्यांना पाच पाचशे ते सातशे रुपये जादा मिळू लागले.मग काँग्रेसच्या 70 वर्षाच्या कार्यकाळात मध्ये असे शेतकरी हिताचे निर्णय का देण्यात आले नाहीत असा सवाल आमदार प्रशांत परिचारक यांनी शरद पवारांना केला आहे
विधानसभापोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूर येथे फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते
तर विरोधी उमेदवाराच्या हाती असणार्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विषयाला आमदार प्रशांत परिचारक यांनी हात घातला. यावेळी त्यांनी कडाडून टीका करताना विरोधकांना आपण कोणत्या विचाराचे वारसदार आहात.. कारखाने बंद पाडण्याच्या का? असा सवाल करत आम्ही विकासाचा मुद्दा घेवून जनतेसमोर आलो असल्याचे स्पष्ट केले.
पुढे बोलताना त म्हणाले, विठ्ठल कारखाना हा राज्यातील अग्रेसर साखर उद्योग होता. जिल्ह्यात सहकार महर्षी व नंतर विठ्ठल सहकारी हे कारखाने होते यानंतर भीमाची उभारणी झाली. 1990 मध्ये या कारखान्याच्या 50 कोटी रूपयांहून अधिकच्या ठेवी होती व यापैशातून कारखान्याचे विस्तारीकरण झाले होते. आज मात्र कोट्यवधीच्या कर्जात हा साखर उद्योग आहे. कर्मचार्यांना पगार मिळत नाहीत. कुटुंंबातील लोकांना कामाला जावे लागत आहे. आपण कालच या कारखान्याच्या काही कर्मचार्यांना अर्बन बँकेच्या माध्यमातून 50 – 50 हजार रूपये कर्ज उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे विरोधकांनी सांगावे की ते कोणत्या विचाराचे वारसदार आहेत .. कारखाने बंद पाडायच्या ..संस्था बंद पाडायच्या? .. यामुळे माझी विनंती आहे सर्वांनी निवडणूक ही कोणत्याही भावनेवर होत नसते, सध्या होवू घातलेली पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही तुमच्या माझ्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने महत्वाची असून लोकशाहीने आपल्याला दिलेली ही संधी आहे. या संधीचे सोने करून घ्यायचे असल्याने भाजपाचे समाधान आवताडे यांना विजयी करण्याचे आवाहन परिचारक यांनी केले. यावेळी परिचारक यांनी मागील अकरा वर्षापासून आपण मंगळवेढ्यातील पस्तीस गावांच्या पाण्या प्रश्न सोडविणार तसेच एमआयडीसी आणणार .. असे ऐकत होतो. मात्र प्रत्यक्षात काय झाले? असा सवाल केला.
दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील परिचारक समर्थकांची बैठक देखील पार पडली असून यास आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा.लक्ष्मण ढोबळे, भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, विजय बुरकूल, गौरीशंकर बुरकूल, अरूण किल्लेदार, औदुंबर वाडदेकर, चंद्रशेखर कोंडूभैरी, काशीनाथ पाटील, मधुकर चव्हाण, बबलू सुतार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यात परिचारक यांनी आपण या निवडणुकीत कुणाला संपवायला एकत्र आलेलो नाही तर जिंकण्यासाठी एक झालो आहोत. या पोटनिवडणुकीने गुलाल खेळायची संधी दिली आहे.यावेळी त्यांनी सर्वांना समाधान आवताडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले की, येथे भापजाची उमेदवारी देण्याबाबत एकत्र बसून समझोता झाला असल्याने कोणीही मान-अपमानात न अडकता आवताडे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागावे.