महाराष्ट्र

“आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाचे व नोकरीच्या अमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

राजेश विटेकर यांचावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा ;तृप्ती देसाईंची पीडितेसह पत्रकार परिषद

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभाग आहे, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.

पुणे : परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.

पीडितेचा आरोप काय?

“माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला आहे. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला.

कोण आहेत राजेश विटेकर?

39 वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष
सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक
परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक
शिवसेना उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव
4 लाख 96 हजार 742 मतं मिळवत विटेकर दुसऱ्या क्रमांकावर
5.3 कोटी रुपयांची संपत्ती, तर 8.7 लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख
राजेश विटेकर पदवीधर असून शेती व्यवसाय असल्याचाही उल्लेख

यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली.

महाविकास आघाडी सरकारवर आरोप

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका