महाराष्ट्र

मनाला चटका लावणारी एक्झिट ; जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

 

मोहोळ – सोलापूर जिल्हा परिषदेचे कामती गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी सकाळी ७च्या सुमारास निधन झाले खताळ हे सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी जवळील जयशंकर हॉटेल चे मालक होते, त्याच ठिकाणी त्यांचे निवासस्थान असल्याने ते सकाळी उठून झोपाळ्यावर बसले तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला .मृत्युसमयी त्यांचे वय 55 होते त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी मुले नातवंडे असा परिवार आहे. लांबोटी गावचे ते दहा वर्षे सरपंच होते राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ डोंगरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे ते अत्यंत विस्वासु होते .भीमा लोकशक्ती परिवार गटातून ते जिल्हा परिषद कामती गटातून विजयी झाले होते. जय शंकर हॉटेल लांबोटी चिवडा आणि चहासाठी त्या मार्गावरील प्रसिद्ध असे हॉटेल आहे. तानाजी खताळ यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई यांनी मोठ्या कष्टातून ते हॉटेल उभे केले आहे. रुक्मिणीबाई खताळ यांचा मोठा मुलगा तानाजी हा गेल्याने खताळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका