महाराष्ट्र

गोपिशेठ आता तुम्हीच आमचा आधार ! पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आ.गोपिचंद पडळकरांची घेतली भेट

 

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करणार

सर्वद्राक्ष बागायतदारांच्या अडचणी समजून घेतल्या असून आगामी काळामध्ये मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याकडे या समस्या मांडणार आहे.लाॅकडाउन करण्यापूर्वी द्राक्ष बागेचे पंचनामे करून त्यांची होणारी नुकसान भरपाई देण्यात यावी. जर प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तर मी यांच्या सोबतच आहे.

आ.गोपीचंद पडळकर

पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आ.गोपिचंद पडळकर त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून द्राक्ष आपल्या व्यथा मांडल्या. मागिल वर्षी लॉकडाऊन पूर्वी द्राक्षेला सरासरी ५० रु. किलो पुढे जागेवर दर होता. परंतू लॉकडाऊन मुळे तोच व्यापारी १० ते १५ रु. किलो प्रमाणे द्राक्षे विकत घेवून लागला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यातच पुन्हा अतिवृष्टीमुळे द्राक्षबागेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला.त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे
तर या वर्षीही द्राक्षमाल तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची वेळ आलेली असताना कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सरकारकडून वेळोवेळी सांगितले जात आहे.त्यातच राज्य सरकारकडून वीजबिलासाठी विद्युत पंपाची कनेक्शन कट करुन त्रास दिला जात आहे. जर द्राक्ष बागेला दोन दिवस पाणी नाही दिले तर माल लूज पडतो त्यानंतर कोणताही व्यापारी ती द्राक्षे विकत घेत नाही. याशिवाय व्यापारी हे “लाॅकडाऊन होणार आहे.त्यामुळे द्राक्ष विकून टाका” अशी खोटी माहिती देऊन कमी किमतीत माल विकत घेऊ लागला आहे.
वीज बिलाची सुरू असलेली हि पठाणी वसुली न थांबविल्यास शेतकऱ्यांना आत्यहत्या करण्या शिवाय पर्याय उरणार नाही. मायबाप सरकारने आमच्या मागणीची दखल घेऊन न्याय द्यावा.
राज्य सरकारला जर या वर्षी पुन्हा लॉकडाऊन करायचे असेल तर अगोदर द्राक्ष शेतीचे कृषी विभागामार्फत पंचनामे करुन हमीभाव द्यावा. व लॉकडाऊन मुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.यासाठी आपण पुढाकार घ्यावा व शेतकऱ्यांचा आवाज बनुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करणार

सर्व द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी समजून घेतल्या असून आगामी काळामध्ये मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याकडे या समस्या मांडणार आहे.
लाॅकडाउन करण्यापूर्वी द्राक्ष बागेचे पंचनामे करून त्यांची होणारी नुकसान भरपाई देण्यात यावी. जर प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तर मी यांच्या सोबतच आहे.

आ.गोपीचंद पडळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका