महाराष्ट्र

पोटनिवडणुकीसाठी डॉ.अनिकेत देशमुख , प्रा.राम शिंदेना उमेदवारी द्यावी. धनगर समाजाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची धनगर समाजाकडून कोंडी

 

धनगर समाजाला डावलले तर सर्वानुमते एकच उमेदवार देणार

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदार संघासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख तर भारतीय जनता पार्टीने प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी द्यावी. या दोन्ही पक्षांनी समाजातील उमेदवार नाकारल्यास सर्वानुमते एकच उमेदवार दिला जाईल अशी माहिती महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. दत्ता डांगे यांनी दिली

पंढरपूर येथील पत्रकार भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी समाजातील विविध पक्षात व सामाजिक संघटना मध्ये काम करणारे पदाधिकारी उपस्थित होते.
धनगर समाजातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व चळवळीतील कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये एक मताने समाजाकडून एकच उमेदवार देण्याचे ठरविण्यात आले असून आज पर्यंत पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असून देखील या ओबीसी घटकातील व्यक्तीस प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. ओबीसी घटकातील धनगर समाज हा मोठा घटक असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये बहुसंख्येने आहे. यासाठी महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कडे महायुतीतील घटक पक्ष भारतीय जनता पक्षाकडे आम्ही समाजातील एका व्यक्तीस उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षचे ज्येष्ठ नेते मा.आ. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी देण्यात यावी. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील धनगर समाजाच्यावतीने दोन्ही पक्षाकडे करण्यात आली आहे.
जर या प्रस्थापित पक्षांनी समाजातील उमेदवारास नाकारले तर मात्र समाजातील एका व्यक्तीस या निवडणुकीत उभा करणार आहे .
तसेच समाजातील विविध पक्षात कार्यरत असणाऱ्या 13 समाज बांधवांकडून ही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यामध्ये यशवंत सेनेचे माधव गडदे, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर जि. प सदस्य सुभाष माने मा. नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर डॉ.मारुती टकले ,प्रदीप खांडेकर,अॅड. रविकिरण कोळेकर ,तानाजी खरात ,बापूसाहेब मिटकरी प्रा.प्रकाश वनगे व संजय माने या इच्छुकांनी ही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे कळविले आहे त्यामुळे ही निवडणूक समाज एक दिलाने लढून विजय होईल असा विश्वास प्रा. दत्ता डांगे यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका