महाराष्ट्र

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा ?

स्थानिक पातळीवरुन पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह

 

स्थानिक पातळीवरुन पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. या बैठकीत पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पातळीवरुन पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात असल्याचं बोललं जात आहे.
आ.भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. महाविकास आघाडीकडून पंढरपूरची जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. अशावेळी उमेदवार निवडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आहे. भालके कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात येवू नये अशी मागणी किरण घोडके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पञाद्वारे केली आहे.त्याचा राग मनात धरून १५-२० भालके समर्थकांनी किरण घोडकेला मारहाण केली. असल्याचे घोडकेनी पञकारांना सांगितले.मारहाणी नंतर त्या कार्यकर्ताला पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाचा मुलगा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता किरण घोडके हा कारखान्यांने माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे मागिल काही वर्षापूर्वी सुमारे २० लाखांचे कर्ज घेतले आहे.त्या बॅंकेने नोटीस बजावली आहे.ते कर्ज भरण्यासाठी सांगितले जावे अश्या आशयाचा अर्ज अजित पवारांना देण्यासाठी उभा राहिला तर याच वेळी त्यांला मारहाण करण्यात आली.
पंढरपूरमधील बैठक आटोपल्यानंतर अजितदादा आणि जयंत पाटील तातडीने दिल्लीला रवाना झाले. 6 जनपथवरील पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जवळपास अडीच तास बैठक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका