महाराष्ट्र

माढ्याचे आमदार शिंदे यांच्यावर ही गुन्हा दाखल करा

लोकप्रतिनिधी शिंदेंना एक न्याय तर शेतकऱ्याला दुसरा न्याय असा कायदा आहे का ?

 

 

कायदा सर्वांना समान असताना आंदोलनस्थळी उपस्थित असणाऱ्या आमदार शिंदेंवर ही गुन्हा दाखल झालाच पाहिजे – मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधीपक्षनेते,सोलापूर पोलिस अधीक्षक यांना निवेदन देवून मागणी करणार

कुर्डूवाडी :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांच्या वीज कपाती विरोधात केलेल्या आंदोलनात न बोलवता उपस्थित असलेल्या माढा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करा .किंवा मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. अशी मागणी शेतकरी नेते अतुल खूपसे , मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी केली आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माढा तालुक्यातील महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज खंडित केली असल्याने शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत .अवास्तव व खोटी जादा बिले देऊन शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुर्डूवाडी -टेंभूर्णी रोडवर अंबड येथे रास्ता रोको करण्यात आला.या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता .या आंदोलनाचे श्रेय मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळू नये. यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी आंदोलनात न बोलवता सहभाग घेऊन याप्रश्नी शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. आंदोलन समाप्त झाल्यानंतर कुर्डूवाडी पोलीस प्रशासनाने मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांचेसह 15 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र आमदार बबनराव शिंदे यांना उपस्थित असूनही गुन्ह्यातून वगळण्यात आले .हा पोलीस प्रशासनाचा कुठला न्याय. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची प्रवृत्ती कुर्डूवाडी पोलीस स्टेशन ने थांबावावी. गुन्हा दाखल करायचाच असेल तर आमदार शिंदे यांच्यासह मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे .अन्यथा गुन्हा मागे न घेतल्यास कुर्डूवाडी पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी दिला आहे .या याबाबतच्या मागणीचे निवेदन गृहमंत्री, सोलापूर अधीक्षक सातपूते मॅडम सह वरिष्ठांना देणार असल्याची माहिती अतुल खुपसे व प्रशांत गिड्डे यांनी दिली आहे

मनसे ला श्रेय जाऊ नये म्हणून न बोलवताच लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी –

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करणार असल्याचे निवेदन आठ दिवसांपूर्वी दिले होते. या वेळी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे कोणत्याही शेतकऱ्यांनी अगर आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बोलावले नव्हते .परंतु शेतकरी आंदोलनात मी सहभागी असल्याचे दाखवण्यासाठी व मनसेला याचे श्रेय जाऊ नये म्हणून ते उपस्थित राहिले होते. मात्र पोलिस प्रशासनाने मनसेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले परंतु आंदोलनस्थळी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यावर या पद्धतीने गुन्हे दाखल केले तोच न्याय लोकप्रतिनिधींना लागू नाही का? कायदा जर सगळ्यांना सारखा असेल तर लोकप्रतिनिधी वर गुन्हा दाखल करा किंवा आमच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते ,सोलापूर पोलीस अधीक्षक यांना याबाबतचे निवेदन देवून मागणी करणार आहे
प्रशांत गिड्डे
मनसे जिल्हाध्यक्ष

लोकप्रतिनिधींचा त्यात सहभाग नव्हता-
वीज वितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.गर्दी जमवण्यासाठी लोकप्रतिनिधी चा कोणताही सहभाग नाही.

पोलीस निरीक्षक.
डोंगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका