महाराष्ट्र

शेतकरी मृत्यूस कारणीभूत महावितरणचा कनिष्ठ अभियंता वाघमारे सह एकावर गुन्हा दाखल

ऊसाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा वीजेच्या धक्याने झाला होता मृत्यू

 

पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथिल घटना

पंढरपूर – महावितरणचे सुस्ते येथिल कार्यरत कनिष्ठ अभियंता वाघमारे आणि काथवटे यांनी हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील अजनसोड येथील शेतकरी उत्तम शंकर घाडगे वय 60 वर्ष यांच्या एकुलत्या एक मुलास विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी उत्तम शंकर घाडगे यांनी पंढरपुरातील ऍड.पांडुरंग चवरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.या प्रकरणी ऍड.पांडुरंग चवरे यांनी फिर्यादीची बाजू अतिशय सक्षमपणे मांडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी फिर्यादीनुसार केली होती.त्या बाबत झालेल्या आदेशाबर हुकूम सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत दाखल फिर्याद पुढील प्रमाणे आहे
दिनांक 02/02/2021 रोजी सकाळी 07/15वा.माझा मुलगा गट नं 127,128 मध्ये 265 जातीच्या नवीन लागणीच्या ऊसाला पाणी देण्याकरीता गेला होता.तो.9/50पर्यत घरी आला नाही.म्हणून मी त्यास बघणे करीता शेतामध्ये गेलो त्यावेळी माझा मुलगा विजयकुमार हा दिसला नसल्याने मी माझे शेती लगत असलेले श्रीमंत भारत चव्हाण.मारूती बापुराव घाडगे,अमरदिप अनंत घोडगे,यांना मुलगा विजयकुमार हा दिसला आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांनी दिसला नसल्याचे सांगितल्याने आम्ही सर्वजण मिळुन परत ऊसाला पाणी चालू असलेल्या शेतजमिनीत जावुन पाहिले.त्यावेळी माझा मुलगा विजयकुमार उत्तम घाडगे हा उताणा अवस्थेत निपचीत पडलेला होता.हालचाल होत नव्हती व त्याचे डाव्या गुडघ्यास दोन्ही हातास पंजास व तळव्याला भाजलेले दिसले.तसेच त्याचे संपुर्ण शरीर काळे पडलेले होते.व महावितरणाच्या इले.लोखंडी पोलजवळ तुटलेल्या स्टे वायर (ताण)ची तार त्याच्या डाव्या गुडघ्यावर व दोन्ही हातास स्पर्श केलेली दिसुन आली.त्यावेळी मुलाची अवस्था बघुन मी त्याला पकडेल म्हणून श्रीमंत भारत चव्हाण.मारूती बापुराव घाडगे,अमरदिप अनंत घोडगे, यांनी मला धरले व बाजुस बसवले.श्रीमंत भारत चव्हाण यांनी महावितरण कर्मचारी व अमरदिप घाडगे यांनी पोलीस स्टेशनला कळविले महावितरणच्या कर्मचारी यांनी सदर डी.टी.सी. ला येणार फिडर बंद करून विज पुरवठा खंडीत केला.त्यानंतर ग्रामीण रूग्णालय पंढरपुर येथे अमरदिप घाडगे व मारूती बापुराव घाडगे यांनी मुलगा विजयकुमार यास विठ्ठल बापुराव घाडगे यांचे पिकअप मधुन घेऊन आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले होते.त्याबाबत पंढरपुर तालुका पोलीस ठाणेस अकस्मात मयत नं 008/2021रजिस्टरी दाखल आहे. त्यानंतर विद्युत निरिक्षक विभाग सोलापुर यांनी त्यांनी केलेल्या अपघात स्थळाचे निरिक्षण व तपासणी तसेच नोदविलेले जबाब व चौकशी पोलीस पंचनामा व श्वविच्छेदन अहवाल यावरून त्यांनी सदर अपघात हा विद्युत संच माडणीवर योग्य निघा देखभाल व दुरूस्ती न केल्यामुळे घडले असल्याचा अभिप्राय दिला आहे.तरी सदर विज वितरण मधील तुंगत येथिल महावितरण कार्यालयातील श्री निलेश प्रदीप वाघमारे कनिष्ठ अभियंता व सुस्ते ता पंढरपुर येथील महावितरण कंपनीने लाईट देख रेखीकरीता नेमलेले योगेश सुभाष काटवटे यांना वेळोवेळी सदर तुटलेल्या स्टे वायरची (ताण) माहिती देवुनही सदर ताण स्टे वायरची दुरूस्ती केली नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे निष्काळजीपणा,हयगय ,कर्तव्यास कसूर केल्यामुळे माझा एकुलता एक मुलगा विजयकुमार उत्तम घाडगे महाविद्युत विज वितरण कंपनीतच्या गट नं 128 मधील लोखंडी खांबामध्ये इन्सुलेटर नसल्याने स्टे वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे सदर स्टे वायर माझा मुलगा ऊसास पाणी देत असताना डाव्या गुडघ्याला स्पर्श झाल्याने व दोन्ही हात भाजुन संपुर्ण शरीर काळे पडुन माझ्या मुलाचा मृत्यु झाला त्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मधील कनिष्ठ निलश प्रदीप वाघमारे व सुस्ते ता पंढरपुर येथील महावितरण कंपनीने लाईट देख रेखी करीता नेमलेले योगेश सुभाष काटवटे हे मृत्युस कारणीभुत आहेत.माझे कुंटुंबास जबरदस्त मानसिक व शाररिक धक्का बसल्याने वेळेत एफ.आय.आर.दाखल करता आली नाही.व विद्युत निरिक्षक विद्युत निरिक्षण विभाग सोलापुर यांचा अभिप्राय आल्याने आज रोजी पोलीस ठाणेस तक्रार दाखल करण्यास आलो आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका