महाराष्ट्र

जीएसटी कर बुडवल्या प्रकरणी ‘या’ कारखान्याच्या चेअरमन सह 16 संचालकांविरोधात गुन्हा दाखल

जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कील यांनी दिली फिर्याद

 

काँग्रसचे नेते विशाल पाटील यांच्यासह कारखान्याच्या सोळा संचालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय तसेच सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सांगली (प्रतिनिधी) : जीएसटी कराचे 12 कोटी 44 लाख रूपये चुकवल्याप्रकरणी वसंतदादा पाटील कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकाविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कील यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 2020-21 या वर्षात सांगली येथील वसंतदादा पाटील साखर कारखान्यातील विक्री केलेल्या मालावर व्यापार्‍यांकडून जीएसटी घेऊन देखील 12 कोटी 44 लाखांची रक्कम राज्य जीएसटी कार्यालयात भरण्यात आलेली नाही. याबाबत जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कील यांनी संचालक मंडळास विचारणा केली होती. सदर जीएसटीची रक्कम व्यापार्‍यांकडून वसूल करून देखील ती रक्कम जीएसटी विभागाला भरण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे याप्रकरणी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या मध्ये विशाल पाटील, संभाजी मेंढे, मंगल पाटील, शिवाजी पाटील, संपत माने, रणजितसिंह पाटील, सुरेश पाटील, सुनील आवटी, अमित पाटील, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, महावीर पाटील, विक्रमसिंह पाटील, दौलतराव शिंदे, अण्णासाहेब पाटील, जिनेश्वर पाटील यांचा समावेश आहे.

काँग्रसचे नेते विशाल पाटील यांच्यासह कारखान्याच्या सोळा संचालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय तसेच सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका