महाराष्ट्र

……अनं दत्ता मामांनी चिमुकल्यांचा जे. सी. बी. खरेदी करून पुरविला बालहट्ट !

राज्यमंत्र्यांची अशीही ओळख

इंदापूर : सोलापूर जिल्ह्यचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे संपूर्ण मंत्रिमंडळात एक आगळेवेगळे नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. मंत्री भरणे यांच्या साधेपणाचा अवघा महाराष्ट्र साक्षीदार आहे. या ना त्या कारणाने त्यांच्यातील असणारा साधेपणा नेहमीच प्रकाशित झालाय ,आजही अगदी तसंच घडलं आणि कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणाऱ्या मामाने चिमुकल्यांचा ही हट्ट पुरवत उपस्थितीतांची मने जिंकली.

जंक्शन येथील मयुर मंगल कार्यालयात आज रविवार दि.07 मार्च रोजी एक विवाह सोहळा संपन्न झाला. नव वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या विवाह सोहळ्यास आवर्जून सपत्नीक उपस्थिती लावली. लग्न विधी पार पडल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी कार्यालयाच्या बाहेर अगदी तोंडालाच एक महिला लहान खेळणी विकण्यासाठी बसली होती. खेळणी विकूनचं तिचा उदरनिर्वाह चालत होता. ही खेळणी पाहून लग्न सोहळ्यास उपस्थितीत असणाऱ्या एका महिलेच्या चिमुकल्याने आई मला तो जे.सी.बी. पाहिजे असा हट्टचं धरला आणि ते बाळ आईकडे हट्ट करतेय पाहून मामांनी क्षणार्धात त्या बाळाला चक्क खेळण्यातील तो जे.सी.बी.खरेदी करुन त्याचा हट्ट पुरवला.

दत्तामामा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतर लहान चिमुकल्यांही दत्ता मामांनी खेळणी खरेदी करून दिली. त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण करण्यात मामांनी धन्यता मानली.खेळणे विकणाऱ्या महिलेला दोन हजार रुपयाची नोट देऊन उरलेले पैसे तुम्हालाच राहू देत म्हणतं त्यांचीही विचारपूस केली.

दत्तामामांकडे आजपर्यंत त्यांचे असंख्य कार्यकर्ते कोणता न कोणता हट्ट करतात आणि मामा त्यास आढेवेडे न घेता तो तात्काळ पूर्ण करतात हे ज्ञात आहे. मात्र मोठ्यांबरोबर मामा चिमुकल्यांचा ही हट्ट पूर्ण करायला कुठेही कमी पडत नाहीत हेच यातून दिसून आलं.तर पुन्हा एकदा दत्ता मामांचा हळवा स्वभाव उपस्थितीतांना पहायाला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका