सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून पहिल्या टप्प्यात १९ मयत पोलीसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती
११ पोलीस शिपाई व ८ चालक पोलीस शिपाई यांचा समावेश

सोलापूर : सन २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या महामारी मुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील मयत
पोलीस अंमलदार यांचे पोलीस पाल्यांची अनुकंपातत्वावर पोलीस भरती घेण्यात आलेली नव्हती.पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून सोलापूर ग्रामीण पोलीस दलात रिक्त
असलेल्या पोलीस अंमलदार यांचे पदापैकी अनुकंपा तत्वावरील पदे सत्वर भरणेबाबत आदेश झाल्याने
आज रोजी पहिल्या टप्प्यात १९ पोलीस पाल्यांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली. त्यापैकी
११ पोलीस शिपाई व ०८ चालक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
यावेळीसोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक,तेजस्वी सातपुते व पोलीसउप-अधीक्षक मुख्यालय,सुर्यकांत पाटील यांचे हस्ते १९ पोलीस पाल्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
या संपूर्ण अनुकंपा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पोलीस अधीक्षक, तेजस्वी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुर्यकांत पाटील, कार्यालयीन अधीक्षक विजय पांगळ, प्रमुख लिपीक सिद्राम गायकवाड, वरिष्ठ श्रेणी लिपीक दिपक खाडे व आस्थापना, शाखेकडील सर्व कर्मचारी तसेच सपोफौ.शिवशरण यांनी विशेष कर्तव्य बजावले.