महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची होणार तपासणी : जिल्हाधिकाऱ्यांनी काढला नवा आदेश

 

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील कोरोना वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज (शुक्रवारी) सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात येणारी सर्वच प्रवासी वाहने पोलिसांनी तपासावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत

सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची होणार तपासणी वाहनचालक तथा वाहनातील व्यक्‍तींकडे मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास एक हजारांचा होणार दंड दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास दोन हजारांचा दंड करण्याचे आदेश होऊनही नियम मोडल्यास सात दिवस वाहन होणार जप्त
दुसऱ्यांदा नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचा परवाना निलंबनाचेही दिले आदेश
वाहनात अतिरिक्‍त प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड
जिल्ह्यात प्रवेश करताना अथवा जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत. दरम्यान, कारवाई करताना वाहनातील व्यक्‍तीकडे मास्क नसल्यास त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करावा, अशा सूचनाही आदेशातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. एकदा दंड भरुनही त्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे वाहन सात दिवसांसाठी जप्त केले जाणार आहे. तर वाहनचालकाचा परवानादेखील निलंबित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणाऱ्या पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे. तीनचाकी वाहनात तीन तर चारचाकीत चार (चालकासह) प्रवासी असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वाढीव प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड केला जाणार आहे. या आदेशानुसार तत्काळ कार्यवाही सुरु करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, तीन व चारचाकी वाहनचालकांसाठी दंडाची रक्‍कम पाचशे रुपये असून दुसऱ्यांदा तसा प्रकार केल्यास एक हजारांचा दंड केला जाईल, असेही ओदशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका