पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक समिती वादाच्या भोवऱ्यात
स्मारक समिती व्यापक करा अन्यथा संघर्ष अटळ - प्रा.बंडगर

ज्यांनी योगदान दिले तेच समितीवर असावेत. जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा अवमान तर रोहित पवारांच्या समावेशाने समाजात प्रचंड नाराजी
पंढरपूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे राज्य शासनाने नुकतीच स्मारक समितीची घोषणा केली. मात्र ही समितीच वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या समितीमध्ये विद्यापीठ नामांतरासाठी संघर्ष केलेल्या, लाठ्या काठ्या खाललेल्यांना व स्मारकाच्या मागणीसाठी आंदोलन, राज्यसरकार तसेच विद्यापिठाकडे पाठपुरावा केलेल्यांना दूर ठेवत इतरांची सदस्यपदी निवड केली आहे.
तर जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नाव माञ सातव्या क्रमांकावर असून हा त्यांचा अवमान केला असल्याची माहिती नामांतर कृती समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी दिली.
पंढरपूर येथे पञकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माळशिरसचे माजी नगराध्यक्ष मारोतराव पाटील ,माऊली हळणवर ,प्रा.सुभाष मस्के बिरूदेव शिंगाडे, बापू मेटकरी, रा स प विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज देवकते, प्रा.संजय लवटे, माळाप्पा खांडेकर , मिलिंद येळे, संजय माने,सुजित मस्के ,समाधान काळे नितीन काळे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठ आवावरामध्ये अहिल्यादेवींचे भव्य असे स्मारक व्हायलाच हवी व ते तातडीने व्हायला हवे परंतु राज्यसरकारने तीन वेळा समिती बदलली ,निधीची घोषणा झाली. परंतु अद्याप निधी मिळालेला नाही. उच्च व तंञ शिक्षणमंत्री सामंत प्रत्येक वेळी सोलापूरला येऊन घोषणा करतात. मात्र एक रुपयाही विद्यापीठाला देत नाहीत.माञ नुसती घोषणाबाजी करून चालणार नसून तातडीने स्मारक व्हायला पाहिजे अशी सर्व समाजघटकांची मागणी असताना देखील हे सरकार मात्र सातत्याने नियुक्त केलेली स्मारक समिती बदलण्याचे काम करतय.आणि स्मारकाच्या उभारणीत कुठल्या प्रकारची सुरुवात होत आहे
मागील सहा महिन्यापूर्वी उच्च शिक्षण मंत्र्यांनी दोन कोटीची केली घोषणा केली . व पुन्हा आता मागील घोषणेचा विसर पाडीत दीड कोटी रुपयांची घोषणा केली. तरीही एक रुपया देखील विद्यापीठाला या कामासाठी मिळाले नाही. जर राज्य सरकार स्मारकाच्या कामांमध्ये राजकारण करीत असेल तर समाज बांधवांनाही
राजकारण करायला भाग पाडू नका .असा इशारा देत जर राज्य सरकारची स्मारक उभा करायची इच्छा नसेल तर तसं सरकारने जाहीर करावं.आम्ही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन आम्ही अहिल्यादेवींस साजेस असं स्मारक विद्यापीठ आवारामध्ये उभा करू असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला.
सन 2008 सालापासून 2019 सालापर्यंत अनेक लोकांनी विद्यापीठ नामांतर असो व स्मारक समिती असो यासाठी बहुमोल योगदान दिले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सर्व आमदारांनी पाठिंबा दिला सर्वच नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.असे असताना राज्य सरकार कडून अहिल्यादेवीच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग केला जात आहे ही थांबून तातडीने सर्वसमावेशक अशी स्मारक समिती तयार केली पाहिजे अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा यावेळी प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी दिला
यावेळी माऊली हळणवर म्हणाली की , विद्यापीठाच्या नामांतरासाठी व स्मारक समितीच्या साठी कोणतेही योगदान नसणारे तसेच जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्तींचा यामध्ये समावेश केला आहे. विद्यापीठाशी कोणताही संबंध नसणारे रोहित पवार यांचे नाव ३ नंबरला घेण्यात आले आहे. मात्र अकरा वेळा प्रतिनिधित्व केलेले जेष्ठ नेते मा.आमदार गणपतराव देशमुख यांचे नाव ७ नंबरला घेण्यात आले असल्याने या क्रमवारीला आमचा विरोध असून याचा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत.