राजकीय

पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब; आ.पडळकरांचा घणाघात

जेजुरी गडावरील अहिल्यादेवीं होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मेंढपाळांच्या हस्ते केलं अनावरण

 

जेजुरी गडावरील अहिल्यादेवीं होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मेंढपाळांच्या हस्ते केलं अनावरण


पुणेः जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलेलं असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्यादेवीच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलंय.
गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्यादेवींचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडलं होतं. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं

गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांकडून त्या पुतळ्याचं अनावरण

शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका