खाकी वर्दीतल्या माणसाची असेही माणूसकीचे दर्शन ; शेतकरी कर्जमाफीसाठी दिला एक महिन्याचा पगार

पंढरपूर

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले पत्र

पंढरपूर : पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकर्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिनाचा पगार ४४ हजार शंभर रूपयेचा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या नावे दिला आहे. आणि याबाबतचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
शेतकऱ्यांच्या दारात जर एखादा भिक्षुकी भिक्षा मागण्यांसाठी आला तर शेतकरी त्याला सुपाने धान्य देतो.आणि तोच भिक्षूक आपल्या झोळीतील मुठभर दाणे शेतकऱ्याच्या सुपात परत टाकतो व आशिर्वाद देतो.त्याच प्रमाणे मीही अडचणीतील शेतकऱ्यांना खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न केला आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील स्वयंपुर्तीने मदत केली पाहिजे असे मत माढा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश तुकाराम मांदे या शेतकऱ्यां प्रति संवदेनशील पोलिस अधिकार्यांनी आपल्या भावना पंढरी दर्पण शी बोलताना व्यक्त केल्या.
सततचा दुष्काळ त्यात पावसाळ्यात अतिवृष्टी नंतर अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी पुर्ण हताश झालेला असुन कर्जबाजारी झाला आहे. या शेतकर्यांला आता सरकाराच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफी करावी अशी आर्त हाक शेतकरी सरकारला करत आहेत.
नुतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सकारात्मक आहेत. व तो विषय ते सक्षमपणे हातळला जात असल्याचे बातम्यातुन समजते. परंतु सरकारला कर्जामाफी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समजते. त्यामुळे या आर्थिक अडणचणीतुन मार्ग काढण्याकरीता शासनाने राज्यात काम करणारे केंद्रातील असो अथवा राज्यातील सर्वच कर्मचार्यांच्या १५ दिवसांचा पगार व लोकप्रतिनिधींचे मानधन यासाठी घ्यावे. व शेतकरी कर्ज माफी करावी. त्यासाठी मी माझा एक महिन्याची पगार ४४१०० देत असुन तो आपण स्विकार करावा. अशी विनंती रमेश मांदे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. शेतकर्यांसाठी त्यांनी शासनाकडे मदतीचा हात पुढे केल्याने खाकी वर्दितील माणुसकीचे दर्शन दिसुन येत आहे.

सध्या शेतकरी संकटात आहे. त्याची मनाला तळमळ वाटते. सामजिक भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माझा एक महिन्याचा पगार धनादेश स्वरूपात सुपूर्द करत असल्याचे
सहायक पोलिस उपनिरीक्षक- रमेश मांदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *