केळी व ज्वारी पिकांचे पंचनामे करा – अन्यथा धरणे आंदोलन ,बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

पंढरपूर

कृषि

पंढरपूर (प्रतिनिधी):-
परतीच्या पाऊसाने राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले असून यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ज्वारी,कांदा व मका या पिकांचे सततच्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पंढरपूर तालुक्यातील करकंब विभागात केळी व ज्वारी ही पिके विविध रोगांमुळे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितत आहेत त्यामुळे या शेती पिकांचे पंचनामे केले पाहिजेत.करकंब विभागातील अधिकारी केळीचे पंचनामे करण्याचे आदेश नाहीत, अशी खोटी माहिती शेतकऱ्यांना देत आहेत. असा आरोप ही संघटनेने केला आहे. तर पंचनामे करण्याचे अधिकार फक्त गावकामगार तलाठी यांना असून कृषि अधिकार्यांचे ते कामच नाही. असे सांगत टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप ही शेतकरी करीत आहेत. कृषि विभाग व तहसील विभागात ताळमेळ नसल्याने शेतकऱ्यांना वेटीस धरले जात आहे.

तरी केळी व ज्वारी या शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अन्यथा तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटना बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने यावेळी दिला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर,नितीन बागल अतुल कारंडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

पाऊसाने हानी झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याच्या सक्त सुचना — –
पंढरपूर तालुक्यात पडलेल्या परतीच्या पाउसामुळे शेतकऱ्यांच्या ज्या पिकांची हानी झाली आहे. त्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्यासाठी सक्त सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. याची काळजी घेतली जाईल
वैशाली वाघमारे
तहसीलदार पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *