अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान. शासकीय अधिकाऱ्यांने केले पंचनामे सुरू

पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार ,ना.चिंचोली येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार ,नारायण चिंचोली येथे गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तलाठी, कृषी साहाय्यक,
ग्रामसेवक यांच्या पथकाकडून पाहणी करून पंचनामे सुरू असुन गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस पडत असताना काल पहाटे चार वाजल्यापासून सुमारे दोन तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे अनेक शेतातील बांध फुटी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या परिसरात ज्वारी ,कांदा, द्राक्षे, डाळिंब ,सोयाबीन ,मका, ऊस ,आदी पिके व फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे या परिसरातील कांदा पिक अक्षरश सडून चालले आहे त्यामुळे या परिसरातील सर्वच बाधीत शेतकऱ्यांचे पंचनामे करून आम्हाला शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. या पंचनामा स्थळी तलाठी यू.एस.जाधव कृषी सहाय्यक एस डी माळी ग्रामसेवक एम.एच भुसे आदी सह नुकसानग्रस्थ शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *