महसूलमंत्र्यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करू देणार नाही: शिवसेना आक्रमक ; चंद्रकांत पाटील यांना पुजेपासून रोखणार

पंढरपूर

 

– मंदिर समितीला दिले निवेदन

राज्यपाल अथवा शेतकरी वारकऱ्यास मान देण्याची मागणी

पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही़ सत्तेतल्या पदांचं समसमान वाटप व्हावं, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरूच आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे़ हा वाद सुरूच असताना आता दुसºया वादाला सुरूवात झाली आहे़ हा वाद म्हणजे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय पूजेपासून रोखण्यासाठी आता पंढरपूर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

कार्तिकी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना देण्यात येऊ नये. अन्यथा पंढरपुरातील शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी जाहीर केले आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मागील दोन दिवसापूर्वी कार्तिकी एकादशी दिवशी होणाऱ्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते.

कोल्हापूर व सांगली भागातील पूर स्थिती हाताळण्यात चंद्रकांत पाटील हे अयशस्वी झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. पंढरपूर मध्ये ही अनेक पूरग्रस्तांना शासकीय मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. पिक विमा पंचनामे श
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन अपूर्ण आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी यात्रेनिमित्त होणाऱ्या शासकीय महापुजेचा मान घेऊ नये. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊनच विठ्ठलाची शासकीय महापूजा हे राज्यपाल व शेतकरी यांच्या हस्ते करून घ्यावी. मंदिर समितीने पाटलांना पूजेपासून रोखावे अन्यथा शिवसेना त्यांना पंढरीत येऊन शासकीय महापूजा करू देणार नाही असा इशारा मंदिर समितीला पत्रकाद्वारे शिवसेनेची तालुका संघटक संदीप केंदळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *