‘खेकड्याने’ जिल्ह्यातील शिवसेना फोडली ; माजी मंत्री खंदारे यांचा सावंत यांच्यावर घणाघाती हल्ला

पंढरपूर

 

तानाजी सावंत यांची पदावरून हकालपट्टी करा.

सोलापूर : पैशाची आणि सत्तेची मस्ती आलेल्या तानाजी सांवत यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संपवली आहे. खेकड्याने धरण फोडले आहे का ? हे माहीत नाही पण या खेकड्याने शहर व जिल्ह्यातील शिवसेना फोडली असल्याचा घणाघाती हल्ला शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी तानाजी सावंत यांच्यावर केला ते पंढरी दर्पण शी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, तानाजी सांवत यांनी संपर्कप्रमुख पदाचा पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील सेना हद्दपार झाली असून सेना संपविण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे.संकुचित व्रताचे आणि अंहकारी तसेच जातिपातीचे राजकारण करून ह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवसेनेला सुरूंग लावण्याचे काम सांवत यांनी केले आहे. पुण्यातील बैठकीमध्ये माजी संपर्क प्रमुख खा.राहुल शेवाळे व माजी खा.रविंद्र गायकवाड यांना लाथा घालून बाहेर हाकलून दिले पाहिजे असे अर्वाच्य भाषेत व्यक्तव्य केले होते.तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या शब्दा बाहेर नाहीत असे बिंबवण्याचा प्रयत्न करीत आपली वचक बसविण्याचा पहिल्याच बैठकीत प्रयत्न केला.शहर मध्य,करमाळा, माढा,मोहोळ ,बार्शी या मतदारसंघात सेनेच्या उमेदवारांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले . याला कारणीभूत फक्त आणि फक्त तानाजी सावंत आहेत हे सांगण्याची गरज नसल्याचे खंदारे यांनी सांगितले.
२०१४ मध्ये शहर मध्य मधून महेश कोठे यांना उमेदवारी दिली होती.त्यावेळी युती नसतानाही महेश कोठे यांनी चांगली मते मिळविली होती. जिल्हा प्रमुख असलेल्या व स्वतः च्या ताकदीवर १८ नगरसेवक निवडून आणणार्या महेश कोठेनां जातिपातीचे राजकारण करीत यावेळी उमेदवारी कापली.परवाचे निवडणूकीचे निकाल पाहता अपक्ष कोठे यांना जर तीस हजार मते मिळाली.तीच मते युतीच्या उमेदवाराला मिळविता आली नाहीत. त्यामुळे सेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. यांचे नेमके कारण तानाजी सावंत यांच्या कडे आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला.
बार्शी मध्ये दिलीप सोपल यांच्या सारखा तगडा उमेदवार सेनेला मिळाला असताना त्यांच्या नशिबी देखील भाऊसाहेब आंधळकर व राजेंद्र मिरगणे यांच्याशी संगणमत करून सोपल यांना पाडण्याचा खटाटोप सांवत यांनी केल्याचाही आरोप खंदारे यांनी केले.
मोहोळ विधानसभा निवडणुकीत मागील वेळी मनोज शेजवाल यांनी ४२ हजार मते घेतली. मनोज शेजवाल खरेखुरे अनुसुचित जातीचे असल्याचे डोक्यात ठेवून शेजवाल यांना उमेदवारी देतो म्हणून शेवट पर्यंत झुलवत ठेवले आणि शेवटच्या क्षणी तिकीट कापले.
करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात शिवसेना घराघरात पोहचविण्याचे काम केले. त्याभागात आजही रोडकिंग व पाणिदार आमदार म्हणून नारायण पाटील ओळखले जातात.एवढे मोठे काम त्यांनी केले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस मधून आयात व्यक्तीस उमेवारी दिली.आणि नारायण पाटील यांनाही शेवटच्या क्षणा पर्यंत उमेदवारीसाठी झुलवत ठेवले.त्याही ठिकाणी सेना पराभूत झाली.जिल्ह्यात असलेली एकमेव सेनेची जागा पैशाच्या रूपाने परक्या उमेदवाराच्या घशात घातली.
माढा मतदारसंघातही निष्टावंतांला डावलून उमेदवारी देण्यात आली. दुहेरी लढत असताना व सेनेचा उमेदवार निवडून येवू शकत असताना ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास सहकार्य केले.याला सर्वस्वी जबाबदार तानाजी सावंत व त्यांची चांडाळ चौकडी असल्याचा खळबळजनक आरोप खंदारे यांनी केला आहे. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुख असलेल्या तानाजी सावंत यांची पदावरून हकालपट्टी करावी यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिक व पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ घेवून करणार असल्याचे उत्तम प्रकाश खंदारे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *