पगारीसाठी ‘विठ्ठल’च्या कार्यकारी संचालकासह अधिकार्यांना कामगारांनी कोंडले. ; राजूबापू पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सोडले .

पंढरपूर

पगारासह बोनसची मागणी

पंढरपूर : वेणुनगर – गुरसाळे येथिल आ.भारत भालके चेअरमन असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी फेब्रुवारी महिन्यापासून पगार थकित असल्याच्या कारणावरुन कारखान्याचे कार्यकारी संचालक बेल्हेकर यांना धक्काबुक्की करित त्यांच्यासह लेबर आँफिसर , सेक्रेटरी , शेती अधिकारी, वर्कमाँनेजर यांनाही कार्यकारी संचालकाच्या आँफिस मध्येच कोंडून ठेवण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कारखान्याच्या कर्मचार्‍यांना फेब्रुवारीपासून पगार करण्यात आलेला नाही,दिवाळी तोंडावर बोनसही मिळालेला नाही.प्रशासनाकडून दिवाळी आधी पगार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.त्यानुसार कार्यकारी संचालकांच्या केबिनबाहेर सकाळपासून कर्मचारी वाट पाहत थांबले होते.माञ,ते कारखान्याकडे लवकर आले नाहीत.सायंकाळी सहाच्या सुमारास ते कारखान्याच्या ठिकाणी येताच त्यांना पगार कधी करणार अशी विचारणा करित घेराव घातला , त्याच वेळी कार्यकारी संचालकांनी कामगारांना कामावर येवू नका ,पगार मागणाऱ्या कामगारांचे गेट बंद करण्याचे आदेश सुरक्षा अधिकार्यांन्या देताच कामगारांचा संताप अनावर झाला.त्यांनी कार्यकारी संचालकांना धक्काबुक्की करीत केंबिन कडे ढकलत नेवुन कोंडून ठेवले. जर आमच्या पगारी करता येत नसतील तर तुम्ही कार्यकारी संचालक पदाचा राजिनामा द्या.अशी मागणी यावेळी कामगाराकडून करण्यात आली.त्यांच्या सोबत कारखान्याचे लेबर आँफिसर रोडगे व सेक्रेटरी करपे व इतर अधिकार्यांनी यांनाही कोंडून ठेवण्यात आले होते.कामगारांच्या मागणीनुसार अधिकार्यांनी आपले राजिनामे दिले असल्याचे कामगारांनी सांगितले. त्याच वेळी
सांयकाळी ९ वाजता कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील यांनी कामगारांची भेट घेवून दोन दिवसात दिपावली सणासाठी बोनस देणार असून पगारी मात्र कारखान्यास पैसे उपलब्ध झाल्यानंतर केल्या जातील अशी हमी दिल्यांनतर कार्यकारी संचालक, लेबर आँफिसर, सेक्रेटरी यांना सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *