सोलापूरचे ‘कारभारी’ बनू पाहणाऱ्या सावंतांच्या अट्टहासामुळे शिवसेनेची ‘वाताहत’ ; माढा, करमाळा , शहर मध्य उमेदवारी वरुन चर्चेला उधाण

पंढरपूर

 

शेजारच्यांनी बरं केल अन्  आमदार केलं

पंढरपूर : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होवून एकच दिवस झालेला असताना राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र, कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने देखील मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी पक्षबदल करणाऱ्या आयारामांना जनतेने घराचा रस्ता दाखवला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे कारभारी बनू पाहणाऱ्या तानाजी सावंत यांच्या अट्टहासामुळे पक्षाची वाताहत झाल्याचं निकालावरून स्पष्ट झालं आहे.तर माढा,करमाळा आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघात ही शिवसेनेच्या निष्टावंत कार्यकर्याला उमेदवारी दिली नसल्यामुळे व आयारामानां उमेदवारी दिल्यांने निष्टावंतांनी बंडखोरी केली तर माढा मतदारसंघात आ.परिचारकांच्या समर्थकांनी घड्याळ हाती घेतल्याने अनेक चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीपूर्वी तानाजी सावंत यांनी शिवसेनेतील निष्ठावंतांना डावलत आयारामांना उमेदवारी देऊ केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी सावंत यांच्यावर सोपवली होती. त्यांचे भाऊ शिवाजी सावंत हे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पहात आहेत.
करमाळा मतदारसंघात शिवसेनेचे आ.नारायण पाटील विजयी होण्याची शक्यत असताना देखील राष्ट्र्वादीतून आयात केलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांनी बंडखोरी केली. सावंतांचा अतीआत्मविश्वास, बागल आणि पाटील यांच्यामध्ये झालेल्या लढाईचा फायदा अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना झाला.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात तत्कालीन जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी पाच वर्षे मेहनत घेतली होती. आयत्यावेळी कॉंग्रेसच्या दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. येथेही तानाजी सावंत यांच्या आग्रहामुळे सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोठे यांनी बंडखोरी करत निवडून लढवली. या मतदारसंघात कॉंग्रेस विरोधात एकास एक लढाई झाली असती तरी चित्र वेगळे राहिले असते.
माढा मतदारसंघात संजय कोकाटे यांना भाजपातून सेनेत प्रवेश देत त्यांना उमेदवारी दिली.तर निष्टावंताला डावलले.आ.प्रशांत परिचारक यांचे माढा मतदारसंघातील समर्थक काही उघड तर काही छुप्या पद्धतीने राष्ट्रवादीचे उमेदवार बबनराव शिंदे यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रचारा दरम्यान दिसून येत होते.त्यामुळे युतीचा धर्म पाळला जात नसल्याचे शिवसैनिक उघड बोलताना दिसत होते.या पदाधिकार्यावर आ.परिचारक काय कारवाई करणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *