माढ्यात ‘पांडूरंग’ परिवारची राष्ट्रवादीला साथ; माढ्याच्या तिड्यात वाढ ,आघाडी धर्माला तिलाजंली

पंढरपूर

सांगा मालक कुणाचे..? मतदारांना पडला प्रश्न

माढ्याचा तिडा ना. सांवत सोडविणार का.?
पंढरपूर : राज्यात भाजप शिवसेना व मित्रपक्षाची महाआघाडी असून माढा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला आला असून त्याठिकाणी संजय कोकाटे हे उमेदवार म्हणून निवडून लढवित असताना ४२ गावातील परिचारक समर्थक पांडुरंग परिवार नेते मात्र घड्याळाला साथ देत असल्याने शिवसैनिकांतून नाराजी व्यक्त केला जात आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार बबनराव शिंदे विरुद्ध शिवसेना भाजप महाआघाडी चे उमेदवार संजय कोकाटे अशी दुरंगी लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली असली तरी मंगळवेढा -पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांचे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे काहीसंचालक, क्रषी उत्पन्न बाजार समितीचे काही संचालक ,विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हे उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबनराव शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत असल्याने शिवसैनिक व मतदारातून या नेत्यांच्या दुटप्पी भुमिके विषयी तर्कवितर्क काढले जात आहेत. याबद्दल परिवाराच्या प्रमुखांना हे सांगितले असल्याचेही मतदारातून बोलले जात आहे. तर काही नेते पांडुरंग परिवाराच्या प्रमुखाच्या परवानगीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करीत असल्याचे जाहीर सभामधून मतदारांना सांगत आहेत.
तर माढा मतदारसंघात जर परिचारकांनी आघाडी धर्म पाळला नाही तर मंगळवेढ्यात ही आम्ही पाळणार नसल्याचा गर्भीत इशारा शिवसैनिक देत आहेत.
याबाबत ना.तानाजीराव सांवत व भाजपाचे प्रमुख लक्ष देवून हा माढ्याचा तिडा कसा सोडवितात या कडे ४२ गावातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *