भालके जातीवाद करणारा आमदार : दिपक वाडदेकर

पंढरपूर

परिचारकांनी कधीही जातियवाद केला नाही

मराठा समाजाचा ठेका आ.भालकेनी घेतलाय का ?

चळवळीतील कार्यकर्ते संपविण्याचे पाप करणाऱ्यांना मतदान करू नका

पंढरपूर / प्रतिनिधी
2009 सालापासून पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात जातीवाद करणारा एकमेव आमदार म्हणजे भारत भालके असल्याचा घाणाघाती आरोप विजय-प्रताप मंचचे दिपक वाडदेकर यांनी केले. ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ इसबावी येथील आयोजित सभेत ते बोलत होते.

आ.भालकेनी मोहिते-परिचारक घराण्यात भांडण लावली व मागील दहा वर्षांत आपली पोळी भाजून घेतली . परिचारक यांनी आपल्या प्रत्येक संस्थेवर मराठा समाजाला नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे त्यामुळे जातीवाद करणारे परिचारक नसून आ.भालके आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजातील कोणत्याही आंदोलनाला पाठींबा दिला नाही. कोणत्याही अडचणी सोडवल्या नाहीत. याउलट मराठा समाजातील चळवळीत काम करणार्याचे खच्चीकरण करून त्यांना संपण्याच पाप त्यांच्याकडून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान विरोधकांनी खालच्या पातळीवर प्रचार करु नका असा सल्लाही त्यांनी दिला. 70 हजार मराठा समाजाचा ठेका काय भालकेंना दिला नाही. तर मराठा समाजातील नागरिकांनी विचार करून विकास करणार्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. परिचारक कुटुंबांनी कधीही जातीवाद केला नाही. येत्या काळात विजयसिंह मोहिते व सुधाकरपंत परिचारक पुन्हा एकत्र आले असून जिल्ह्यातील विविध विकास कामे करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्यातून सुधाकर परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानपरिदषदेचे आ.प्रशांत परिचारक यांनी इसबावी व शहरात केलेल्या विकास कामांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. व परिचारक यांना पुन्हा काम करण्याची संधी देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी अनिल अभंगराव, शिरीष कटेकर, विकी अभंगराव, अदिनाथ गाडे सर, रवी मुळे, संजय वाईकर, शकुंतला नडगीरे, अशोक डोळ, साईनाथ अभंगराव यांनी आपले भाषणे केली. व्यासपीठावर नगराध्यक्षा साधना भोसले, माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, नगरसेविका भाग्यश्री शिंदे, सचिन शिंदे, माजी नगरसेवक गणेश अधटराव, बादल ठाकूर, सुखदेव मलपे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *