विरोधकांनी कुठलं बी तंत्र वापरू दे आपल उत्तर एकच “ओनली कमळ…ओनली कमळ…” : सदाभाऊ खोत

पंढरपूर

 

विठ्ठलाची अवस्था बिकट ;सभासद ,कामगारांचे हाल

पंढरपूर- ह्या मतदारसंघात आपल्याला कमळ फुलवायचं हाय , आता हितून गेला की तुम्ही कामाला लागा, त्यांनी कुठलं बी तंत्र वापरूं दे फेसबुक, व्हाट्सऍप वर काहीही लिहूद्या आपण एकच उत्तर द्यायचं की ओनली कमळ…ओनली कमळ…

त्यांनी आपल्याला शिव्या शाप जरी दिला तरी आपण त्यांना एकच उत्तर द्यायच ओनली कमळ…ओनली कमळ… असं रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज पंढरपूर येथे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत केले.
राष्ट्रवादीची सध्या दारिद्र्य रेषीच्या यादीत गेलीय , इडीच्या चौकशीत नुसत नाव आलय तर इतका कालवा चाललाय, आम्ही आंदोलने करत होतो तेव्हा खोटे गुन्हे दाखल करत होता ,आम्ही येरवड्यात महिना काढलाय जरा तुम्ही पण येरवड्यात जाऊ बघा कशी अवस्था होते ते असा सल्ला ही राष्ट्रवादी च्या नेत्यांना दिला.
ते पुढे म्हणाले कि पुर्वी राज्यात विठ्ठल पँटर्न राबविला जायचा .आता काय अवस्था करुन ठेवलीय कारखान्याची शेतकऱ्यांना ऊस बिले दिले जात नाही ,कामगारांची बिकट परिस्थिती केली.आणि दुसरीकडे पांडुरंग कारखाना शेतकऱ्यांना ,कामगारांना वेळेवर बिल व पगार देतो.म्हणून विधानसभा निवडणुकी नंतर श्री विठ्ठलाच्या कारखान्याच्या कारभाराकडे परिचारक लक्ष देतील .मला कामगार फोन करून सगळ सांगतात.त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल.तर मागील १० वर्षात मंगळवेढ्यात पाणी आल्याने सगळीकडे हिरवागार झालाय ,असा टोलाही त्यांनी लोकप्रतिनीधीना लगावला.
यावेळी मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुधाकरपंत परिचारक हे ४० हजार मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला .

आज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार, महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सुधाकरपंत परिचारक यांचा अर्ज दाखल करताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप नेते कल्याणराव काळे उपस्थित होते.

दरम्यान, सुधाकरपंत परिचारक यांनी कार्यकर्तां विजयी संकल्प मेळाव्यानंतर अर्ज दाखल करत मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *