पंढरीत सेनेची बंडखोरी, शैलाताई गोडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल . शिवसैनिक व जनतेच्या आग्रहस्तव अपक्ष उमेदवारी

पंढरपूर

 

बंडखोरीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला कि भाजप युतीला ?

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैलाताई गोडसेंनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याचे चित्र आहे.तर मतदारसंघ सेनेचा असूनही जागावाटपात तो रयत क्रांती संघटनेला सुटला.यामुळे शिवसैनिक व जनतेने नाराज झाली असून त्यांनी आग्रह धरला कि तुम्ही अपक्ष अर्ज दाखल करा.म्हणून आज मि उमेदवारी अर्ज दिला असल्याचे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष शैलाताई गोडसे यांना सांगितले. त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी ही निवडणूक लढली आहे. एक शिस्तबद्धरित्या काम करण्याची त्यांची पध्दत आहे. सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास आहे. मात्र त्यांची आमदार होण्याची महत्वाकांक्षा लपून राहिली नसल्याने त्यांनी विचारपूर्वक शिवसेनेत प्रवेश केला होता. पंढरपूर मतदारसंघातील सामान्यांच्या प्रश्नांना हात घालून त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली आहे. मंगळवेढ्याच्या जिव्हाळ्याचा असलेल्या ३५ गावच्या पाणी प्रश्नी त्यांनी थेट हात घालून जन आंदोलन उभे केले होते. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न अभ्यासपूर्णरितीने हताळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
विविध प्रश्न , समस्य, नागरी अडचणीच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. हे सर्व शिवसेनेच्या माध्यमातून सुरु होते. पक्षाकडून तिकीट मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र युतीत ही जागा रयत क्रांतीला सुटल्याने त्यांनी बंडाचे निशाण उभारले आहे.
गोडसेंची ही बंडखोरी महायुतीसाठी अडचणीची ठऱणार आहे. सेनेची पारंपरिक मतदार गोडसेंच्या पाठीशी उभे राहतील अशी सध्याची स्थिती आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भारत भालकेंसाठी देखिल मतविभागणीची भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *