राष्ट्रवादीची ‘उत्तम’ खेळी; जानकरांना माळशिरसमधून उमेदवारी ; नाट्यमय घडामोडीमुळे निवडणूक रंगतदार होणार

पंढरपूर

 

माळसिरस  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरूवारी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली़ त्यात माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ दरम्यान, भाजपने उत्तम जानकर यांना फलटणमधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते, मात्र राष्ट्रवादीने ‘उत्तम’ खेळी करीत जानकरांना माळशिरसमधून तिकीट जाहीर करून नवा पलटवार केला आहे.
लोकसभा निवडणुकीत माळसिरस तालुक्यातून भाजपाचे खा.निंबाळकर यांना एक लाखाचे लिड देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे उत्तम जानकर भाजप कडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत होते परंतु पक्षाच्या नेतृत्वांनी फलटण मधून लढण्याची तयारी करा असा आदेश दिला होता. पण ते फलटण येथून लढण्यास तयार नव्हते. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरूवारी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली़ त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबन शिंदे, मोहोळमधून यशवंत माने तर माळशिरसमधून उत्तम जानकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *