उदगीर येथे मराठा वधु-वर मेळाव्याचे आयोजन ; राज्यव्यापी विनाशुल्क परिचय मेळावा

पंढरपूर

 

मराठा सोयरीकचा पुढाकार

पंढरपूर – -महाराष्ट्र मराठा सोयरीक व किसान शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी विनाशुल्क मराठा वधु-वर परिचय मेळावा रविवार दि. 6 आॕक्टोबर रोजी उदगीर येथील ‘राधेकृष्ण मंगल कार्यालय, देगलूर रोड,उदगीर, येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पंढरपूर समन्वयक गणेश गवळी यांनी दिली आहे.
मराठा सोयरीक यांच्या वतीने महाराष्ट् राज्यातील २२ जिल्ह्यात वधू -वर मेळावे यशस्वी केले असून यावर्षी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मेळाव्या आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश,कर्नाटक या सीमावर्ती भागातील तसेच सोलापूर, उस्मानाबाद व इतरही जिल्ह्यातील मराठा वधु-वर पालक यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष विजयकुमार पाटील,माधवराव गंभिरे(लातूर),प्रा.गोविंदराव जामखंडे,प्रा. रामकृष्ण मांजरे,प्रा. बाबुराव नवटक्के, डाॅ. एस.व्हि.शिंदे,देविदास आवटे,डाॅ.नरसिंग कदम,नागनाथ बागल (सोलापूर),सुधीर काळवाघे(जळगाव),पोपटराव सपकाळ ( औरंगाबाद),रेखा झरे पाटील( अहमदनगर),नितीन बागल(उस्मानाबाद),प्रल्हाद कानडे पाटील(परभणी),रमाकांत जाधव (मुंबई) तसेच महाराष्ट्र मराठा सोयरीक चे संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जवंजाळ पाटील(बुलढाणा)यांनी केले आहे.
या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक पंढरपूर येथे पार पडली यावेळी ज्योतीराम गोरे,डॉ. राजेंद्र दास, पंकज पिंगळे, बजरंग दत्तू,चंदू ढवळे,अशोक जाधव आदी उपस्थित होते.तरी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त मराठा समाजातील वधू -वर पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा सोयरीक पंढरपूरचे समन्वयक गणेश गवळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *