पंढरपूर

जनतेला फसवणाऱ्याला भाजपाचा हाबडा काल कळला ; नाव न घेता आ प्रशांत परिचारकांची लोकप्रतिनिधीवर टीका..

४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार.

पंढरपूर : ज्या जनतेने सत्तेवर बसवल ,प्रत्येक वेळी निवडून दिलं त्याच जनतेला फसवलं , दुपारी १२ पर्यंत वेटींग वर होते,भाषण मोठी मोठी करायची , कुठ कुठ जात होते ,किती तारखेला हे सगळ सांगतो,समोरचा उमेदवार उसन अवसान आणून लढतोय, तेव्हा कार्यकर्त्यानी गटतट बाजूला ठेवून सुधाकरपंत परिचारकांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आ.प्रशांत परिचारक यांनी केले

पंढरपूर येथील बाजार समितीच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले कि , २००९ ला राष्ट्रवादी कॉग्रेसने सुधाकरपंत परिचारक यांना दिलेला शब्द पाळला नाही.त्या अपमानाचा बदल घेण्याची वेळ आलीय,हवा बदलली आहे. हि निवडणूक एकतर्फी आहे. पांडुरंग कारखाना वगळता सर्व कारखाने तोट्यात आहेत.आज अर्बन बँक ३५ कोटी रुपये नफ्यात आहे. आणि बॅलन्सशीट मध्ये दोन कोटी रुपये नफा असलेला पांडुरंग कारखाना एकमेव आहे.एफआरपी दिली आहे,कामगारांचे पगार कधी थकून दिले नाहीत.कारखान्याच्या ठेकेदाराचे सर्व देणी दिली आहेत.आपला कारभार निस्पृह आहे म्हणूनच आपल्या शब्दला सरकार दरबारी वजन आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रयत्न करावेत.
पुढे बोलताना आ.परिचारक म्हणाले कि,आपल्या देशाला पहिल्यांदाच एक कणखर पंतप्रधान भेटला आहे जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला देखील हाताला धरून बसवतो.आज केंद्र आणि राज्य सरकार अनेक धाडसी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे.पंढरपूर व मंगळवेढा तालुकयातील विकास योजनासाठी आम्ही सरकारकडून कोट्यवधी रुपये निधी मंजूर करून आणला,आपल्याला अजूनही अनेक कामे मार्गी लावायची आहेत त्यासाठीच आपण एकजुटीने महायुती सरकारच्या विजयासाठी पर्यंत करायचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *