जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी नेले २७७ उमेदवारी अर्ज

पंढरपूर

 

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी १९४ जणांनी २७७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीत राजेंद्र राऊत, सांगोल्यात दीपक साळुंखे पाटील आणि पंढरपुरात समाधान आवताडे, शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज नेले.

विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृतीचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व तहसील कार्यालयात अर्ज देणे व घेण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी १९४ जणांनी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट विधानसभेसाठी गंगाराम कटकधोंड उर्फ व्यंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर पंढरपूर येथे सुदर्शन खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधानसभानिहाय नेण्यात आलेले अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. कंसात अर्ज नेणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे.
करमाळा: १६ (१३), माढा: ९ (७), बार्शी: ३0 (३0), मोहोळ: १४, सोलापूर शहर उत्तर: १९ (१७), सोलापूर शहर मध्य: ३५ (२७), अक्कलकोट: २२ (१५), दक्षिण सोलापूर : ३७ ,(३७), पंढरपूर: ३६ (२0), सांगोला: ४0 (१९), माळशिरस: १९ (९).
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे, महेश निकंबे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनी अर्ज नेले आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रतिनिधीमार्फत अर्ज नेला आहे.

शहर मध्यमध्ये माजी आमदार आडम मास्तर, स्वाभिमानी रिपाइंचे दीपक गवळी, हिंदुस्तान जनता पार्टीचे गौस कुरेशी, भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ, एमआयएमचे इरफान शेख, बसपाचे राहुल सर्वगोड, शिवसंग्रामचे मनीष गायकवाड व पीपीआयचे आनंद जगदने यांनी अर्ज नेले आहेत.

चोख पोलीस बंदोबस्त
– विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज देण्या-घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केल्याने सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात निवडणूक कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून शंभर मीटरच्या अंतरावर सर्व प्रकारची वाहने रोखून धरण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शहर उत्तर व दक्षिण सोलापूर अशी दोन निवडणूक कार्यालये असल्याने प्रवेशद्वारावरच वाहने अडविण्यात आली. यामुळे वाहतूक जामची समस्या निर्माण झाली. निवडणूक कार्यालयाबाहेर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यालयात अर्ज घेणे व देण्यासाठी आलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *