पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचा भाजपात प्रवेश

पंढरपूर

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजानंतर होळकरांचे वंशज भाजपात
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात मोठमोठे नेते पक्षप्रवेश करत असताना रविवारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

भुषणसिंह राजे होळकर यांच्यासोबतच माथाडी कामगार नेते अविनाश ग्रामिष्ठे, माजी आमदार संदेश कोडविलकर, तेली साहू समाजाचे माजी अध्यक्ष अशोक साहू, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे सरचिटणीस नरेंद्र कामठे आदिंसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कामे पाहून लोकांनी विश्वास ठेवला – चंद्रकांत पाटील

या कार्यक्रमात चंद्रकांच पाटील म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली. आज रेल्वेचे टॉयलेट बायो टॉयलेट झाले. इतक्या बारीक गोष्टीचा विचार मोदींनी केला. गेल्या पाच वर्षात अशा बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणून लोकांनी भाजपवर विश्वास ठेवला.’ त्याचबरोर ‘मराठा आरक्षणाचा विषय देखील याच सरकारने घेतला. धनगर आरक्षणाचा निर्णय कोर्टात आहे, तरीदेखील आदिवासी लोकांना मिळणाऱ्या २२ सुविधा धनगर समाजाला देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. ही पार्टी कोण कुठल्या घरातून आला हे न बघता त्या माणसाचे काम करते’, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावला टोला…

भाजपमध्ये रोज नवनवीन नेते पक्ष प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये येणाऱ्यांनी विधानसभेत निवडणुकीत सहकार्य करायचे आहे. त्यामुळे जंबो पक्ष प्रवेश होतात. भाजपच्या इनकमिंगमुळे विरोधकांही प्रश्न पडला आहे. पवार म्हणतात ईव्हीएममुळे भाजप जिंकतो, पण 2004 पासून ईव्हीएम होते, पण जनतेचे काम करावे लागतात तेव्हा लोक ऐकतात, अशा शब्दात पाटील यांनी पवार यांना टोला लगावला आहे. पाच वर्षांत मोदी सरकारने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. हा पक्ष कोणत्या घरात जन्माला आला हे पाहत नाही, प्रत्येकाला समाधान मिळेल असे काम करते, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघात टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *