‘माझ्या हायातीत सांगोल्यात शेकापचा दुसरा उमेदवार निवडून आणणार’ : आ.गणपतराव देशमुख ; तर “कहो दिलसे आबा फिरसे”,कार्यकर्त्यांचा नारा !

पंढरपूर

 

निवडणूक आबांनीच लढवावी ,आमच्या भावनेचा विचार करा ,कार्यकर्ते आक्रमक

सांगोला : विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे माझ्याकडे पाच नावे आली आहेत मी व शेकापचे सर्व पदाधिकारी यावर निर्णय लवकरच घेणार आहोत. या निवडणुकीत मी उमेदवार नसलो तरी जो उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने आजपासून कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार गणपतराव देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी सरकारी धाेरणांवर टीका केली.

कृषी उत्पन्न बाजार समीती आवारामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार मंथन मेळाव्याच्या वेळी आमदार गणपतराव देशमुख बोलत होते व्यसपिठावर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील पेन -रायगड चे आमदार धैर्यशील पाटील चिटणीस मंडळाचे राज्य सदस्य .एस वि.जाधव कोकण विभाग आमदार बाळाराम पाटील चंद्रकांत देशमुख आदी उपस्थित होते
या मंथन मेळाव्यात शेकापचे कार्यकर्ते प्रंचड आक्रमक झाले होते , आ.गणपतराव देशमुखांनीच निवडणूक लढविली पाहिजे, कार्यकर्त्याच्या भावनेचाही विचार केला पाहिजे यासाठी अनेकजन व्यासपीठावर येवून आबाच्या पाया पडून रडू लागल्याचे दिसत होते.व्यासपीठासमोर कार्यकर्ते प्रंचड आक्रमक भूमिका घेतली होती. “कहो दिलसे आबा फिरसे ” अशी घोषणाबाजी सुरू होती.

यांवेळी आमदार गणपतराव देशमुख म्हणाले ,या निवडणुकीत उभा राहत नसलो तरी राजकारण व समाजकारण सोडणार नाही .माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे .तालुक्यातील शेकापच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाचे राज्य सरचिटणीस जयंतराव पाटील व मी स्वतः पक्षाचे कार्यकर्त्य घेणार आहेत.

तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न ३० जून २०२० पर्यंत सोडविण्यास कटिबद्ध आहे. तसेच आजपर्यंत जी राजकारणामध्ये वाटचाल झाली ती कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मतदारांच्या विश्वासावरच झाली आहे. तुमचे सहकार्य व साथ मिळाली म्हणून हे सर्व काही करता आले. यापुढेही शेकाप पक्ष जिवंत ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य व साथ मोलाची ठरणार आहे.

शेकापचे राज्य सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले, आमदार गणपतराव देशमुख यांचे विचार व कार्य मोठे आहे. गणपतराव देशमुख आमदार असले तरी या तालुक्यातील कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने आमदार आहे. आज वयाच्या ९३ वर्षीही त्यांच्यामध्ये तारुण्य व नवचैतन्य दिसून येत आहे. त्यांचे नाव गिनीज बुकात नोंद झाले आहे. आमदार देशमुख अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहेत. ते पाच वर्षे अखंडपणे काम करतात व निवडणुकीत कामाचे मतदानरुपी मोल मागतात. या निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना व विरोधकांना त्यांची जागा दाखवेल. शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात उज्ज्वल काळ येणार आहे.

यावेळी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार संपत पाटील, चंद्रकांत देशमुख, बाबासाहेब करांडे, संतोष देवकते, वैभव केदार, विशाल काटे, भरत शेळके, विकास खरात, विजय खरात, अक्षय चोरमले, बाबासाहेब देवकर, विनायक कुलकर्णी, बाळासाहेब बनसोडे, कल्पना शिंगाडे आदींनी आपले विचार मांडले.

या विचारमंथन मेळाव्याच्या वेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष पी. डी. जाधव. सूतगिरणीचे अध्यक्ष नानासाहेब लिगाडे, अद्योजक भाऊसाहेब रुपनर, महिला सुतगिरणीच्या अध्यक्षा विमलताई कुमठेकर, उपाध्यक्षा कल्पनाताई शिंगाडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध गावचे, सरपंच-उपसरपंच, सोसायटी अध्यक्ष, पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास येलपले यांनी केले. उपस्थिताचे आभार विठ्ठल शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *