कडकनाथ घोटाळा :महारयत अँग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करा. ‘वंचित’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर ७ सप्टेंबरला धडक मोर्चा.

पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यात ही कडकनाथ चे लोण ,अंदाजे ४०० शेतकऱ्यांची फसवणूक

सोलापूर :- रयत अँग्रो इंडिया आणि महारयत अँग्रो इंडिया या कंपन्यांच्या माध्यमातून कडकनाथ कुकूटपालन व्यवसायातून शेतकऱ्यांना मालामाल करण्याचे अमिष दाखवत कोट्यावधीचा गंडा घालणार्या कंपनीच्या संचालकावर शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करावेत अश्या मागणीचे निवेदन सोलापूर शहर आयुक्तालय अंतर्गत फौजदार चावडीचे पो.नि.संजय साळुंके यांना देण्यात आले आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ७ सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढला जाणार असल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण राज्यभरात चर्चेत आलेल्या रयत ऍग्रो इंडिया व महारयत अँग्रो इंडिया कंपनीचे संचालक संदिप सुभाष मोहिते याच्यासह सुधिर शंकर मोहिते ,हनुमंत शंकर जगदाळे, विजय ज्ञानदेव शेंडे,आणि गणेश हौसेराव शेवाळे या पाचजणा विरोधात इस्लामपूर जि.सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर सोलापूर जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर येत असून करमाळा, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट, माढा ,सांगोला,मोहोळ या तालुक्यातील सुमारे ४०० शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज असून याबाबत वंचित बहुजन आघाडीने निवेदन देवून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे. अशी माहिती प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चदनशिवे यांनी पंढरी दर्पण न्युजशी बोलताना दिली. यावेळी नगरसेवक गणेश पुजारी , रविंकांत गावडे शिवाजी वाघचवरे अमोल गावडे, दिनेश साळुंके ,सागर बंदीछोडे , शेखर बंदीछोडे, अतुल गिराम,
नामदेव लिंगरे, परशुराम लिंगरे ,गणेश लिंगरे, सागर गोरड, सुभाष गोरड बिरा गोरड आबा गोरड, संजीत रेडे ,मलकार पुजारी ,राहुल पुजारी ,आशपाक मुजाद्दीन, नागेश कोंडापुरे ,रवीकुमार उंबरजे मल्लप्पा खरात, महेश गोमे ,विठ्ठल पाथरुट, मल्लु सर्वगोड ,सुरज कांबळे, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *