विधानसभेस कमी जागा मागू पण ‘त्या’ जिंकण्यासाठीच लढवू : महादेव जानकर

पंढरी दर्पण

रासपचा शेेतकरी मेेळावा संंपन्न

विधानसभेसाठी पंढरपूर मंंगळवेढयाची जागा मागणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्यांना मंत्री महादेव जानकर यांनी भर सभेत सुनावले खडे बोल

पंढरपूर : “कार्यकर्त्यानो अगोदर गावागावात बुथ बांधणी करा ,कार्यकर्त्यांची फळी तयार करा आणि मगच विधानसभेची मागणी करा, जागा मागायची अन पडायची असं यापुढे होणार नाही कमी जागा मागू पण त्या जिंकण्यासाठीच लढवू,” असे प्रतिपादन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. तर विधानसभेसाठी पंढरपूर मंंगळवेढयाची जागा मागणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्यांना मंत्री महादेव जानकर यांनी भर सभेत खडे बोल सुनावले.

मंगळवेढा येथे रासपच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रद्धाताई भातंब्रेकर, सुनिल बंडगर, सोमा आबा लवटे पंकज देवकते, माऊली सलगर, लक्ष्मण हाके आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीत रासप मोठ्या तकतीने लढणार असून “जो पर्यंत मत विकणारे लोक कमी होणार नाहीत तरच मत विकत घेणारे नेते तयार होणार नाहीत. चार राज्यात रासपला मान्यता मिळाली आहे राज्यात 1.2 टक्के मतदान झाले आहे . राज्यात रासपचे 98 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. महाराष्ट्र सोडून देशात भाजप बरोबर कुठे ही युती नाही. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीत रासप स्वतंत्रपणे लढणार असून 12 आमदार निवडून येतील, असा” विश्वास ही जानकर यांनी व्यक्त केला.या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *