उपोषणास सुरुवात करताच पाटबंधारे विभागाला आली जाग..! माण नदीला सोडले पाणी ; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश

पंढरी दर्पण

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला आले यश

पंढरी दर्पण न्युज

पंढरपूर :माण नदीला पाणी सोडून गुंजेगाव बंधारा तत्काळ भरण्यात यावा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ही भिमा पाटबंधारे विभागाने दखल घेतली नसल्याने अखेर आज माऊली हळणवर व सागर मासाळ यांनी तनाळी गावा लगत असणाऱ्या उजवा कालव्याच्या दारा जवळ आमरण उपोषणास सुरुवात केली यावेळी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते,मात्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भिमा पाटबंधारे विभागाला जाग आली आणि माण नदीत पाणी सोडले.

मागील एक महिन्यापासून उजनीच्या डाव्या कालव्यात आवर्तन सुरू आहेत.तर
उजनी धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे. मात्र दुष्काळी भागातील जनता पाण्यासाठी आंदोलने करून ही प्रशासन दखल घेत नाही .एकी कडे उजनी व वीर धरणातून भिमा नदीद्वारे सुमारे १००टीएमसी पाणी समुद्राला सोडून देण्यात आले मात्र पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीतील उभी पिके जिवंत ठेवण्यासाठी माण नदीवरील गुंजेगाव बंधाऱ्यात पाणी सोडणे गरजेचे असतानाही पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांच्या मागणीकडे डोळेझाक करीत होता.या गावांमध्ये सध्या भंयकर दुष्काळी परिस्थिती आहे पाण्यासाठी जनता दाहीदिशा भटकत असून जनावरांसाठी पाणी नाही , चारा नाही ,लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. तरीसुद्धा सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर व सागर मासाळ यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. शेतकरी व वंचित आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अखेर पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेतली आणि माण नदीमध्ये पाणी सोडले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक माऊली हळणवर ,सागर मासाळ, दत्तात्रय कोळी, प्रा.महादेव ढोणे मा.सरपंच मारुती मासाळ,अंकुश शेंबडे,गंगाराम मासाळ, बाळासाहेब मेटकरी,महादेव मासाळ, बिराप्पा मोटे, रमेश मासाळ, राजेंद्र बंडगर,महादेव व्हनमाने,अनिल जाधव,आकाश गुरव,बापू सलगर मयुर रनदिवे,अजित गुरव, म्हाळापा मासाळ, प्रणव कुलकर्णी, दिपक गोरे,नाथा बनसोडे,काशिलिंग बुरुगें यांच्या सह तनाळी,खर्डी,गुंजेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *