पंढरीत संभाजी ब्रिगेडने केले शिवस्वराज्य याञेचे स्वागत

पंढरी दर्पण

 

पंढरपूर – पंढरपूर येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य याञेचे स्वागत छञपती शिवाजी महाराज चौक येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले व पाठींबा देण्यात आला.

शिवस्वराज्य याञेचे नेतृत्व करणारे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांचा सत्कार संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांचा सत्कार संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष डाॅ.रामदास घाडगे यांच्यावतीने करण्यात आला.तर पाठींब्याचे पञ शहराध्यक्ष लखनराज थिटे व शहर उपाध्यक्ष स्वप्नील घुले यानी खासदार डाॅ.अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्यात आले.

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष महादेव पवार,तालुका कोषाध्यक्ष शहाजी भोसले,संभाजी ब्रिगेड शाखा चळे,पेहे,बाभुळगाव व सांगोला तालुकाध्यक्ष प्रदिप मिसाळ, शहराध्यक्ष राजू शिंदे,ओमराज मोहिते यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *