पंढरपुर शहर पोलीसांनी केली बनावट गुटखा बनविणार्‍या टोळीस अटक; सात लाखाचा मुद्देमाल जप्त

पंढरी दर्पण

 

पंढरपूर : वरिठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार , एक पिकअप व इंडीगो कार गाडीमध्ये अवैध गुटखा भरुन सदरच्या गाडया या मोहोळ वरुन पंढरपूरकडे येत आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेवून सदर बातमीचा आशय समजवून सांगून त्यांना सापळा रचनेबाबत आदेश दिला.

लागलीच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जुना अकलुज रोड मॅकॅनीकल लाईन व अंबाबाई पटांगण येथे कर्मचारी थांबवून सापळा रचून थांबले असता अहिल्या पुलाकडून एक पिकअप एम.एच.09 सी.यु.1907 ही येत असताना दिसल्याने सदर गाडीस मॅकॅनीकल लाईन येथे असलेल्या कर्मचारी यांनी पाठलाग करुन पकडले. तसेच सदर गाडीचे पाठीमागे येत असलेली एक इंडोगो कार एम.एच. 43 एन 1557 थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये अवैद्य गूटखा व गुटखा मशीन व इतर साहीत्य दिसून आल्याने सदरची दोन्ही वाहने ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणले.

त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्यांचे ताब्यात मिळालेल्या मशिनव्दारे त्यांच्याकडे मिळालेल्या गुटखा बनविण्याच्या साहित्याचा वापर करुन गुटखा बनविला जातो आणि तो गुटखा वेगवेगळया कंपनीच्या पाउच मध्ये भरुन मार्केटमध्ये विकतात असे सांगितले. तसेच सदर वाहनाची पाहणी करता सदर वाहनात गोवा 1000 गुटख्याच्या 1000 पुडया एकूण किंमत 1,000/- रुपये, सैराट 777 गुटख्याच्या 1000 पुडया एकूण 1000/- रुपये, चुना पाउडर 20 किलो एकूण 200/- रुपये, कात पाउडर 20 किलो 8000/- रुपये, जुना वकात मिक्स पावडर 10 किलो एकूण 4000/- रुपये, लिक्वीड पॅराफीन 10 लिटर 700/- रुपये, किंग लेबल 500 नग 500/- रुपये, गोवा 1000 लेबल 1500 नग एकूण 1500/- रुपये, सैराट 777 लेबल 500 नग एकूण 500/- रुपये, किंगा लेबल 500 नग एकूण 500/- रुपये, बादशहा लेबल 500 नग असे एकूण 500/- रुपये असे एकूण 19,400/- रुपयेचा माल मिळून आला तसेच सदर वाहनात असलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अं.क्र. 1) राजेश नरसिंगा पांडव, वय 40 , रा. पांडव गल्ली, आळते, ता. हातकांगले, जि. कोल्हापूर हे सांगून सदर जप्त मालाचे मालक असल्याचे सांगितले 2) अवधुत महादेव वणगे, वय 43, रा. 4/108, माळी मास्टर वाडा, घोरफडे नाट्यगृह मागे, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे इंडिगो वाहन क्र. एमएच 43, एन 1557 या वाहनाचे मालक व चालक असल्याचे सांगितले. 3) सागर राजेंद्र इंगोले, वय 25 र्वो, रा. राज नगर, चिंतामणी नगर, श्रीनीवास प्लॉट, सांगली हे साथीदार असल्याचे सांगितले, 4) शरद बाळासाो पाटील, वय 30 र्वो, रा. सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली हे महिंद्रा पिकअप, वाहन क्र. एमएच 09 सीयु 1907 या वाहनाचे मालक व चालक असल्याचे सांगितले, 5) अतुल मच्छिंद्र घोरपडे, वय 24 र्वो, रा. मु. पो. गार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 6) अमोल सुकुमार जनगौंडा, वय 37 र्वो, रा. मु. पो. आळते, ता. हातकणगंले, जि. कोल्हापूर असे सांगून साथीदार असल्याचे सांगितले.

याबाबत अन्‍न सुरक्षा अधिकारी, श्री. यो. रो. देशमुख यांना बोलावून घेतले असता त्यांनी सदर अवैध गुटखा व इतर साहित्याची पाहणी करुन प्रती बंधात्मक अन्‍न पदार्थांचे सॅम्पल घेवून सदर मुददेमाल ताब्यात घेवून तसा रिपोर्ट सादर करून सदर इसमांविरुध्द फिर्याद दिली.
त्याप्रमाणे त्याच्या वाहनामध्ये व त्यांच्याकडे मिळुन आलेले वेगवेगळया कंपनीचे 8 मोबाईल व रोख रक्‍कम, 2 वाहने, गुटखा बनविण्याची मशीन, गुटखा व गुटखा बनविण्याचे साहित्य असे एकूण 7,83,440/- रुपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर इसमांना अटक करुन त्यांना मा. कोर्ट, पंढरपूर यांचे समोर हजर केले असता त्यांची दिनांक 27/08/2019 रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे.यापूर्वी सुध्दा यातील काही आरोपी विरुध्द महाराष्ट्रात वेगवेगळया ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे सोा, डॉ. सागर कवडे सोा., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली वरिठ पोलीस निरीक्षक, दयानंद गावडे, गुन्हे प्रकटीकरण ााखेचे सपोनि नवनाथ गायकवाड, सपोफैा हनमंत देशमुख, पोहेकॉ/353 उबाळे, पोना/1635 ोख, पोना/1578 राजगे, पोना/1538 चंदनशिवे, पोना/1005 पठाण, पोना/903 कांबळे, पोना/221 औटी, पोकॉ/2020 गुटाळ, पोकॉ/1006 पाटील, पोकॉ/1228 जाधव यांनी केली असून त्याबाबत पुढील तपास सहा. पो. नि. नवनाथ गायकवाड, हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *