गणेश मंडळानी ऑनलाईन अर्ज भरा, यंदाचा गणेश उत्सव पर्यावरण पुरक व डाॅल्बीमुक्त साजरा करा.

पंढरी दर्पण

गणेश मंडळानां तालुका पोलिसांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व सोलापूर ग्रामीण पोलीस यांनी तालुक्यातील गणेश मंडळानां ऑनलाईन अर्ज भरावयाचे असून त्यासाठी वेबसाईट ही देण्यात आली असून या वरून गणेश मंडळांनी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षी प्रमाणे चालू गणेशोत्सव 2019 करीता गणेशाची स्थापना करणे करीता व गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक करिता आपणांस ऑनलाईन अर्ज पोलीसांचे सिटीझन पोर्टलवर भरायचे आहेत.
Website ….. htt://www.mhpolice.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर गणेशोत्सवा करिता गणेश मंडळाची माहिती भरून ऑनलाईन फाॅर्म सादर करावयाचा आहे. यासाठी फाॅर्म भरणे करिता लागणारीआवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
प्रथम आपले पोलीस स्टेशनची निवड करावी. नंतर जागा मालक अथवा ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला ,अर्जदाराचा फोटो, अर्जदार आधार कार्ड ,मंडळ रजिस्टर असल्यास धर्मदाय आयुक्त यांचा परवाना इत्यादी कागदपत्रे जोडणे/असणे बंधनकारक असून गणेश मंडळानी घ्यावयाची खबरदारी व काळजी बाबत मार्गदर्शक सुचना
ही देण्यात आल्या आहेत. यामध्ये श्रीगणेशाची स्थापना करताना स्टेज व मंडप हे मजबूत भक्कम व पाऊस आले नंतर मुर्ती भिजणार नाही असे करणेत यावे.
मंडप व स्टेज जवळ विदयुत तारा असू नये अशा पध्दतीने रचना करावी.मंडप व स्टेज मुळे रस्त्याला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सव मध्ये डिजे, डाॅल्बी सिस्टीम वापरता येणार नाही.
डिजे, डाॅल्बी वापरल्यास संबंधित सिस्टीम जप्त करून मालक व मंडळावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूक करिता वादय व स्पीकर परवानगी घेणे बंधनकारक आहे.
रात्री 10:00 नंतर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे स्पीकर, साऊंड व वादय वाजविता येणार नाहीत.जातीय तेढ निर्माण करणारे व धार्मिक भावना दुखावणारे कमानी, पोस्टर, बॅनर, होर्डींग्स व डिजीटल लावू नयेत अगर आक्षेपार्ह देखावे सादर करू नयेत.गणेशोत्सव करीता अधिकृतरित्या विजेचे कनेक्शन देण्यात येत आहे तरी ते मीटर बसवून घ्यावे.गणेश मंडळानी दर्शनासाठी आलेल्या मुली व महिलांना वेगळे रांगेतून दर्शनाची व्यवस्था करावी. छेडछाड व दागीने चोरीचे प्रकार घडू नये याकरिता सीसीसीटीव्ही कॅमेरा तात्पुरते बसवून घ्यावेत.
मंडळाचे ठिकाणी दररोज रात्री 4 ते 5 स्वयंसेवक मुक्कामी हजर राहून मुर्ती सुरक्षा बाबत योग्य ती दक्षता घेतील पाहिजे.
आपल्या गणेश मंडळाचे ठिकाणी आवश्यकता नुसार सूचना फलक व प्रबोधनक फलक लावतील.
फटाके वाजविताना कोणासही इजा होणार नाही याची दक्षता घेवून फटाके फोडतील.
गणेश मंडळानी जास्तीत जास्त सामाजिकी उपक्रम राबवावेत
तसेच वृक्षारोपण, पूर ग्रस्तांसाठी मदत निधी किंवा वस्तू स्वरूपात मदत देणे यासारखे उपक्रम राबवावेत असे आवाहन पंढरपूर तालुका पोलिसांकडून करण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी परवानगी बाबत पोना/गजानन माळी (पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन ) यांच्या शी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *