“दत्तक “घेतलेल्या ब्रम्हऩाळ गावास प्रकाश आंबेडकरांची भेट ;पुनर्वसनाच्या कामाची केली पाहणी

पंढरी दर्पण

 

सांगली – प्रकाश आंबेडकर यांनी ब्रम्हऩाळ या दत्तक घेतलेल्या गावास भेट दिली व पुरामध्ये नुकसान झालेल्या व पडलेल्या घरांचे पुनर्वसनाच्या कामकाजांची पाहणी केली. तसेच नागरिकांना आंबेडकर यांच्या हस्ते रेशनचे वाटप या वेळी करण्यात आले ,तसेच त्यांनी पुनर्वसनाच्या कामकाजाचा आढावा घेतला , यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर , जयसिंग शेंडगे राज्यप्रवक्ते अमोल पांढरे ,सुनिल खोत नानासाहेब वाघमारे ,प्रशांत शेजाळ,दशरथ माने व कार्यकर्ते उपस्थित होते . पुनर्वसनाचे काम चालू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ब्रम्हऩाळ या गावात भेट दिली. कोल्हापूर सांगली जिल्ह्याला मोठ्याप्रमाणात पुराचा तडका बसल्यानंतर जीवित व आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणात झाले आहे .

सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे.

पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. आंबेडकर महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत ज्यांनी सरकारच्या पोकळ धोरणांवर व यंत्रणेवर अवलंबून न राहता सामाजिक जबाबदारी म्हणून गाव दत्तक घेऊन गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *